ठाणे, अविनाश उबाळे : भारताचे पक्षी मानव डॉ.सलिम अली आणि निसर्ग साहित्यिक मारुती चितमपल्ली या दोघांच्या जन्म दिनानिमित्त ५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा दरवर्षी पक्षी सप्ताह म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करतात आणि असा पक्षी साप्ताह साजरे करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील तानसा अभयारण्यातून करण्यात आली होती. यावेळी शहापूर तालुक्यातील पक्षी निरीक्षकांना निरिक्षणातून दुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्षी दिसून आले. यात वन पिंगळा, काळा करकोचा,मलबारी कर्णा, बहिरी ससाणा, तुरेवाला सर्पगरुड इत्यादी पक्षांसह एकूण १५८ पक्षांची नोंद झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील तानसा अभयारण्यातून ५ नोव्हेंबरपासून पक्षी सप्ताहाची सुरुवात झाली. यावेळी शहापूर तालुक्यातील पक्षी निरीक्षकांना निरिक्षणातून दुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्षी दिसून आले. यात वन पिंगळा, काळा करकोचा,मलबारी कर्णा, बहिरी ससाणा, तुरेवाला सर्पगरुड इत्यादी पक्षांसह एकूण १५८ पक्षांची नोंद झाली आहे. यातील पर्ण वाटवट्या, माशीमार, धोबी, दलदली ससाणे,तीरचिमण्या सह हिवाळी स्थलांतरित पक्षी देखील आले आहेत. परंतु पानपक्षांच्या प्रजाती हळू हळू यायला सुरुवात होत आहे.लवकरच पाणथळ जागा पान पक्षांनी गजबजून जातील.
भृंगराज, हळद्या, पोपट, घुबड, कोटवाल, बगळे, पानकावळे, कुटूर्गा, घार, पिवळ्या कंठाची चिमणी, पाकोळी, गरुड, तिसा इत्यादी सामान्य पक्षी दिसले या वरून असे दिसत आहे कि आपल्या परिसरात वन्यजीवांच्या अधिवासाची योग्य काळजी वन्यजीव विभाग व लोकसमूहातून घेतली गेली तर नक्की पक्षांसह इतरही वन्यजीव दिसयला लागतील.आहे.परंतु छुप्या पद्धतीने होणारी जंगलतोड,अवैध शिकार, विविध प्रकल्प, वनवे रोखण्यासाठी लोक समूहांनी वन विभागास पुढाकार घेतला वनसंवर्धन होण्यासाठी मदत होईल व जंगलातील पक्षांचा किलबिलाटा वन्यजीवांचे अस्तित्व पुढील पिढीला देखील अनुभवायला मिळेल.अशा भावना वन्यजीव अभ्यासक व पक्षीनिरीक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या.
तानसा अभयारण्य-वन्यजीव विभाग ठाणे आणि वन विभाग शहापूर यांच्या मार्गदर्शन सहकार्यामुळे हा पक्षी साप्ताह उत्साहात संपन्न झाला.आऊल कॉन्झरवेशन फौंडेशन यांनी पक्षी सप्ताहात योगेश शिद, अविनाश भगत, शाहीद शेख, शंतनू डे, प्रथमेश देसाई,भरत वाख,दामू धादवड, अक्षय गहरे, रोहिदास डगळे या पक्षीनिरीक्षकांनी सहभाग घेऊन वेळ मिळेल त्या नुसार आपल्या भागातील पक्षांच्या नोंदी ई-बर्ड या मोबाईल अप्लिकेशन केल्या त्यामुळे ह्या पक्षांच्या नोंदी एका ठिकाणी नोंद झाल्या आहेत.