१५ जणांचा मृत्यू तर २५ जखमी

प्रतिनिधी/९ मे मुंबई : मध्यप्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात बसचा भीषण अपघात झाला आहे. बस नदीत कोसळल्याने अपघातात १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी असल्याची आहेत.

सद्यस्थितीत जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आहे. खरगोन ठिकरी महामार्गावर हा अपघात झाला आहे.मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील डोंगरगाव येथे पहाटे ५.३० वाजता हा अपघात झाला.

प्रवाशांनी भरलेली बस पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळली. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून अपघाताची कोणतीही माहिती अधिकृतरित्या प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.

अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मदतीची घोषणा केली आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे अपघातातील मृताच्या नातेवाईकांनी चार लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना ५० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांन २५ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अपघात नेमका कसा झाला याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पुलाचे कठडे तोडून बस बैराड नदीत कोसली आहे. यामध्ये १५ जणांचा मृत्यू तर २५- २५ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिश्रा यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *