कल्याण/ प्रतिनिधी : कल्याण- डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र कल्याण उपनगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने अखेर त्या गावांचे प्रतिनिधीत्व करणा-या १३ नगरसेवकांचे पद अखेर रद्द झाले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत नोव्हेंबर २०२० ला संपत आहे. त्यामुळे प्रभाग रचनेचा कार्यक्रम हा एप्रिल अथवा मे २०२० या कालावधीत होणे आवश्यक होता. मात्र कोविड १९ मुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन जारी करण्यात आला. त्यामुळे निवडणुकांचे टप्पे स्थगित करण्यात आले होते. अखेर राज्य शासनाने अनलॉक १ च्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध अटी शर्तीचे पालन करून शासकीय कार्यालये खासगी कार्यालये दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गतच राज्य निवडणूक आयोगाने कल्याण डोंबिवली महापालिकेला प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यानुसार निवडणुकीेच कामकाज सुरू झालं आहे.
महापालिकेतून २७ गावाँपैकी १८ गावे वगळून त्यांची स्वंतत्र कल्याण उपनगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे त्या गावातील नगरसेवकांचे पद रद्द करा असा अहवाल पालिकेच्या निवडणूक विभागाने पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना पाठविला होता त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्याने मुदत संपण्यापूर्वीच नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे. त्यामुळे नगरसेवक काय भूमिका घेतात याकडं लक्ष वेधलं आहे.
या नगरसेवकांचे पद रद्द
मोरेश्वर भोईर, रमाकांत पाटील, सोनी अहिरे, उर्मिला गोसावी, कुणाल पाटील, प्रमिला पाटील, प्रभाकर जाधव, दमयंती वझे, जालिंदर पाटील, इंदिरा तरे, विमल भोईर, शैलजा भोईर, सुनिता खंडागळे या १३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.
ही 18 गावे वगळली
घेसर, हेदुटणे, उंब्रोली, भाल, द्धारली, माणेेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडीवली, ढोकळी ,दावडी, चिंचपाडा पिसवली, गोळीवली, माणगांव ,निळजे, सोनारपाडा ,कोळे
**