कल्याण : श्री संत राममारूती समाधी संस्थान कल्याण यांच्यावतीने श्री संत राममारूती महाराज (भिवंडीकर) यांचा १०५ वा पुण्यातिथी महोत्सव कल्याण येथे सुरू आहे. यावेळी जेनरीक आधारचे अर्जुन देशपांडे यांचा संस्थानचे अध्यक्ष शिरीष गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 ३० सप्टेंबरपासून ते रविवार ८ ऑक्टोबरपर्यंत कल्याणात हा महोत्सव साजरा करण्यात आला. रविवार ८ ऑक्टोबरला श्री चा प्रयाणकाळ उत्सव साजरा करण्यात आला या दिवशी श्रींच्या पादुकांची पालखीतून शाेभायात्रा काढण्यात आली  श्रीं चे समाधीवर लघुरूद्राभिषेक व पंचामृत महापुजा, श्रीं च्या प्रयाणकाळाचे भजन, श्री विष्णू सहसहस्त्र नामाचे सामुदायिक पठण, भाषाप्रभू हभप जगन्नाथ महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन, भजन महाप्रसाद श्रीं च्यापादुकांची पालखीतून भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले. अशी माहिती संस्थांनचे अध्यक्ष शिरीष गडकरी यांनी दिली.  प्राची गडकरी यांनी सुत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *