१३ नोव्हेंबर मुंबई : पंजाबमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. लुधियाणामधील खन्ना येथे १०० वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. धुक्यामुळे वाहने एकमेकांवर आदळल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
पंजाबमधील खन्ना येथे धुक्यामुळे सुमारे १०० वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. अमृतसह-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे.पंजाबमधील खन्ना जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघाताचं कारण धुके असल्याचं बोललं जात आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अमृतसर दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ सुमारे १०० वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. या अपघाता सुमारे १२ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीअमृतसर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये सुमारे १०० वाहनांचे नुकसान झालं आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही रुग्ण गंभीर असून त्यांना इतर रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे.
या अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या वाहनामध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे.मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्याही निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे.
या अपघातात जीवितहानीबरोबरच मोठ्या प्रमाणात आर्थिक हानीही झाल्याची माहिती समोर येत आहे. सुमारे २०-२५ किलोमीटर अंतरावर वाहने एकमेकांवर आदळली. धुक्यामुळे समोरचं दिसत नसल्याने मागून येणार्या गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या. फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ आणि धुके यामुळे दृष्यमानता कमी होऊन अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे २०-२५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.