डोंबिवली, दि. 09 (सा.वा.):
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त साहू तेली समाज वेलफेयर सेवा महाराष्ट्र प्रदेश संस्थेतर्फे मेगा रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर नुकतेच डोंबिवलीतील आदर्श विद्यालय येथे दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात ८५ जणांनी रक्तदान केले आणि शेकडो लोकांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. रक्तदानाचे महत्त्व पटवून देत, संस्थेने मानवतेच्या या कार्यात अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.शिबिराच्या यशस्वीतेत दोस्ताना जनसेवा ग्रुप, धडकेबाज युवा प्रतिष्ठान, हिंदी भाषा जनता परिषद, भारतीय साहू तेली समाज, साहू सेवा संघ उल्लासनगर, राजाजी पथ गणेश मित्र मंडळ डोंबिवली, आणि संकट मोचन हनुमान मंडळ आदी संस्थांचे सहकार्य मिळाले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मुकुंद (विशू) पेडणेकर, साहू तेली समाज वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष मोहन गुप्ता, सचिव रतिलाल गुप्ता, ज्येष्ठ समाजसेवक मोहन गुप्ता, भाजपचे सदस्य रमाकांत गुप्ता, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे भूषण चव्हाण, आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच शिवसेना पदाधिकारी सागर दुबे, सामाजिक कार्यकर्ते सुनील गुप्ता, नरेंद्र नवल तेली, मनोज गुप्ता, अध्यक्ष अशोक गुप्ता आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरातील नागरिकांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा लाभ घेतला.
——