माझ्यावरील प्रेमामुळे माझा निवडणूक अर्ज भरण्यासाठी डोंबिवलिकरांची अलोट गर्दी

डोंबिवली (ता. 29):

महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने नागरिकांचे प्रचंड प्रेम आणि पाठिंबा अनुभवला. अनेक वर्षांपासूनचे मित्र सदानंद थरवळ हे त्यांच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे उपस्थित होते आणि यावेळीही त्यांनी रविंद्र चव्हाण यांना भरभरून आशीर्वाद दिला.

रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, “सदानंद थरवळ आणि माझ्या ऋणानुबंधाची सुरुवात वर्षानुवर्षांपूर्वी झाली असून त्यांच्या आशीर्वादाने मी नेहमीच प्रेरित होतो. त्यांच्या सोबत माझ्यावर प्रेम करणाऱ्या हजारो डोंबिवलीकर नागरिकांनी आज माझा आत्मविश्वास वाढवला.” चव्हाण यांनी थरवळ यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या नेहमीच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि डोंबिवलीकरांच्या प्रेम व आदरामुळे आपल्या कामात अधिक उत्साह मिळत असल्याचेही सांगितले.

यावेळी त्यांच्या अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये विधानसभा संघटक आणि ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, माजी मंत्री मार्गदर्शक जगन्नाथ पाटील, शशिकांत कांबळे, मंदार हळबे, महापौर विनीता राणे, विकास म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, विश्वनाथ राणे, निलेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर, खुशबू चौधरी, मितेश पेणकर, मंदार टावरे, विश्वदीप पवार, शैलेश धात्रक, रविसिंग ठाकूर, दिनेश दुबे यांचा सहभाग होता.

डोंबिवलीतील जैन समाज, आगरी समाज, व्यापारी महामंडळ, लेवा समाज, ब्राह्मण ज्ञाती समूह, युवा मोर्चाचे सर्व प्रतिनिधी आणि डोंबिवलीकर नागरिकांनी तुडुंब गर्दी करून चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.

—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!