शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी अनुसुचित जाती जमातीचा निधी वळवला

 दलित आदिवासींचा कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा 

कल्याण  : शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी अनुसूचित जाति व जमाती यांचा एक हजार  कोटीचा निधी वळवण्यात आल्याने त्या निषेधार्थ दलित व आदिवासी समाजाने कल्याण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केला.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी अनुसूचित जाती-जमातीचा निधी वळवल्याने  आंबेडकरवादी अन्याय, अत्याचार, निर्मूलन समन्वय समितीने केला आहे.तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी समन्वय समितीच्या शिष्ट मंडळाने तहसिलदारांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली पाहिजे त्यासाठी वेगळी तरतूद सरकारने करावी, पण दलित आदिवासींच्या बजेटवर कुऱ्हाड चालवू नये . घरकुल, आरोग्य. शिक्षण, शिष्यवृती तसेच दलित अत्याचार प्रकरणात पीड़ित कुटुंबा साठी असणारी आर्थिक मदतीसाठी असणारा निधी वर्ग करणे ही कृती लज्जास्पद आहे.दलित आदिवासीसाठी असणारा निधी इतरत्र वळवू नये.महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळा ची कर्ज माफ व्हावी म्हणून कित्येक वर्षाची दलित आदिवासींची मागणी प्रलंबित आहे, ती मान्य न  करता उपयोजनेचे पैसे वर्ग करणे, म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *