ठाणे :- (अविनाश उबाळे)
शहापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या प्रचारासाठी महायुतीतील भाजपा,शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आरपीआय (आठवले गट,) श्रमजीवी संघटना व इतर घटक पक्ष हे प्रचारात मोठ्या ताकदीने उतरल्याचे चित्र शहापूर तालुक्यात पाहण्यास मिळत आहे.शहापूर तालुक्यातील महायुतीच्या प्रचाराची ही घौडदौड पाहता महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाला शहापूरातील मतदार पसंती देतील असा ठाम विश्वास आता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना वाटत आहे.
शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दरोडा यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना शहापूर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात लोकांचा वाढता पाठिंबा व उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शहापूर विधानसभा निवडणुकीत दरोडा हे विजयी होतील असे एकंदरीत राजकीय वातावरण दिसून येत आहे.महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांनी बुधवारी सकाळी डोळखांब परिसरातील चोंढे,साकुर्ली, टेंभुर्ली,तलवाडे,रानविहीर, जांभूळवाड,साकडबाव,कोठारे, या परिसरात आपला प्रचार दौरा पुर्ण दौरा केला महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या प्रचाराला डोळखांब परिसरात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांनी आपल्या प्रचाराची सुरवात ही सर्वप्रथम डोहळेपाडा येथील भगवान शिव शंकराच्या दर्शनाने केली व नंतर उमेदवार दौलत दरोडा हे प्रचार रॅलीत सहभागी झाले. प्रचार रॅली ही ढोलताशांच्या गजरात निघाली होती.तब्बल १६५ वाहनं घेऊन मोठ्या संख्येने प्रचारात महायुतीचे कार्यकर्ते दरोडा समर्थक उपस्थित होते.यावेळी दौलत दरोडा तुम आगे बढो,हम तुम्हारे साथ,है अशा घोषणांनी डोळखांब परिसर दुमदुमून गेला
होता.येऊन,येऊन,येणार कोण. महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांच्याशिवाय आहेच कोण अशा घोषणा दरोडा समर्थक व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी प्रचार रॅलीत भाजप पक्षाचे तसेच शिवसेना शिंदे गट,आरपीआय राष्ट्रवादी,श्रमजीवी संघटना या घटक पक्षातील व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व महीला कार्यकर्त्या या मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या होत्या.
——