१५ डब्यांच्या गाड्या, लेडीज स्पेशल लोकल सोडण्याची मागणी केली आहे
डोंबिवली , ता,30 (प्रतिनिधी)
डोंबिवली शहराचे वाढते नागरिकरण लक्षात घेऊन आगामी काळात १५ डब्यांच्या लोकल डोंबिवलीसह कल्याण मधून सोडण्यासाठी मी स्वतः आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी यांना सगळी माहिती दिली असून लवकरच सकारात्मक बदल घडतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. कै. रामभाऊ म्हाळगी, रामभाऊ कापसे यांची रेल्वे प्रवाशांशी असलेलं अतूट नाते सर्वश्रुत आहे, ते जपण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असून मला रेल्वे प्रवासातील अडचणी माहिती आहेत असेही ते म्हणाले.
डोंबिवलीच्या प्रवाशांशी नेहमीच रेल्वे प्रवासात चर्चा होत असते, बुधवारी स्वतः येऊन माझा जाहीरनामा प्रवाशांना दिला, त्यांनी त्यांच्या अपेक्षा मला सांगितल्या आहेत, त्यामुळे मी त्या वरिष्ठ पातळीवर मांडणार आहे.
लांबपल्याच्या गाड्या वेळेत येत नाही त्यावर देखील आम्ही चर्चा केली आहे. समस्या जास्तीतजास्त कशा सुटतील यावर लक्ष देणार आहे. महिला स्पेशल लोकल कल्याण, डोंबिवलीमधून सोडण्यासाठी मी विशेष लक्ष घातले असल्याचे त्यांनी महिला प्रवाशांना आश्वस्थ केले.