कल्याण, ता.१४- (प्रतिनिधी) –
“होम मिनिस्टर” या मालिकेमुळे घराघरात पोहचलेले आदेश बांदेकर आता शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
सचिन बासरे हे कल्याण पश्चिमधून महाविकास आघाडी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेमध्ये आदेश बांदेकर यांची प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीला महीलांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला.
शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे कल्याण पश्चिम मधिल उमेदवार सचिन बासरे यांच्यासाठी महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर प्रचार फेरीत सहभागी झाले. आदेश बांदेकर यांनी या प्रचार फेरीच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेमध्ये वहीनींना मतदान करण्यासाठी साद घातली. शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांच्या विजयासाठी मशाल पेटवण्याचे आवाहन आदेश बांदेकर यांनी यावेळी केले.या रॅलीत सचिन बासरे यांच्यासह उपशहरप्रमुख बाळा परब, दिनेश शेटे, विभाग प्रमुख समीर मानकर, राजेश महाले, विभाग संघटक मदन राजपूत, शाखाप्रमुख अमोल गायकवाड, पंकज माने, विजय घोंक्षे, नरेंद्र नेमाणे, तसेच प्रकाश जाधव, महेंद्र घोलप, सुनिता लेकावळे,अलका अवळसकर,दिपाली शहाणे, स्वाती निकम, शितल घोलप, विजया कडव, नयना मदने, नयना मसुरकर, संगिता घोणे, अस्मिता गायकवाड, मंजुशा सावंत, मंगला गोसावी, पुजा घोणे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.