कल्याण: ता :१२:(प्रतिनिधी):-
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं लहुजी शक्ती सेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांच्याकडून मतदारसंघातील विविध भागांमध्ये प्रचार दौरे काढले जात आहेत. त्याअंतर्गत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून रविवारी सायंकाळी शहाड आंबिवली परिसर पिंजून काढत विश्वनाथ आत्माराम भोईर यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन केले.
शहाड येथील अंबिका नगर येथून सुरू झालेला हा प्रचार दौरा शहाड गाव, बंदर पाडा, गणपती मंदिर वडवली, गणेश नगर, पाटील नगर, नगरसेवक दुर्योधन पाटील कार्यालय, स्टेशन मार्केट, विराट चौक, अटाळी गाव, हनुमान मंदिर, नगरसेवक गोरख जाधव कार्यालय, वाल्मिकी स्कूल, आंबिवली गावमार्गे नेपच्युन सोसायटी येथे समाप्त करण्यात आला.
या प्रचार दौऱ्यामध्ये जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, मा.आमदार नरेंद्र पवार , विधानसभा संघटक संजय पाटील, मयूर पाटील, भिवंडी लोकसभा समन्वयक सुनील वायले, उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील, मा.नगरसेवक गणेश कोट, गौरख जाधव, मा.नगरसेविका हर्षाली थवील, विभाग प्रमुख रमण तरे, उपशाहर संघटक प्रभाकर भोईर, शाखाप्रमुख बाळाराम पाटील, नवनाथ पाटील, रोशन चौधरी, उपाध्यक्ष नवनाथ पाटील, शशिकांत पाटील, मोहन कोणकर, अनंता पाटील, राजन पाटील, दशरथ पाटील, अक्षय पाटील, बाळ भालेराव, रमेश पाटील, रणदिवे मामा, मारुती पाटील, कुणाल पाटील, विष्णु पाटील, राजू भंडारी, कैलास ढोणे, वसंत पाटील, सागर पाटील, लता भोईर, युवासेना विधानसभा समन्वयक किशोर पाटील, युवासेना उपशहर वैभव पाटील, तसेच महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-