मुंबई : सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. चाकरमान्यना कामावर जाण्याची घाई त्यातच मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचे हाल झाले. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ ओव्हर रेड वायरवर बांबू कोसळल्याने मध्या रेल्वेला ब्रेक बसला. माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ जलद मार्गावरच्या लोकल ट्रेन थांबल्याने अखेर प्रवाशांनी रेल्वे ट्रॅक मधूनच पायपीट केली.
माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी वापरण्यात येणारे बांबू ओव्हरहेड वायरवर पडले आहेत. त्यामुळे जलद मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. बांबू बाजूला केल्याशिवाय ओव्हरहेड वायर पूर्ववत होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी जलद मार्गावरची वाहतूक खोळंबली आहे. मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच जलद मार्गावर हा खोळंबा झाला आहे. माटुंगा, कुर्ला, घाटकोपर या रेल्वे स्थानकांच्या मागे पुढे जलद लोकल थांबल्या आहेत.