डोंबिवली, ता. 27 (प्रतिनिधी):

डोंबिवली शहराच्या पश्चिम भागातील मोठागाव आणि जैन कॉलनी विभागातील शेकडो उत्तर भारतीय बांधवांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या दिलखुलास स्वभावाने प्रभावित होऊन हे बांधव भाजपमध्ये सामील झाले आहेत. रविवारी मंत्री चव्हाण यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.

मंत्री चव्हाण, राज्यभरात प्रचारात व्यस्त असूनही, या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहिले. डोंबिवलीच्या मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक व भाजप सरचिटणीस नंदू परब यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.

या प्रवेश सोहळ्यात अनिल मिश्रा, अंबिका सिंग, ओम प्रकाश, विश्वकर्मा श्रीराम मिश्रा, कृष्णा मिश्रा, उमेश मिश्रा, दिनेश मिश्रा, राघवेंद्र मिश्रा, अजय शुक्ला, अभिषेक मिश्रा, अभिषेक सोनू, अभिषेक सिंग, नवीन शर्मा, विकास प्रजापती, दर्शन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कार्यक्रमाला भाजप लोकसभा प्रभारी शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, दत्ता माळेकर, रविसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे, ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर, मीतेश पेणकर, बाळा पवार यांची उपस्थिती होती.

मंत्री चव्हाण यांनी या प्रवेश सोहळ्यादरम्यान नंदू परब, रविसिंग ठाकूर, संदीप शर्मा आणि दिनेश दुबे यांच्या विशेष प्रयत्नांचे कौतुक केले. “संघटनामजबुतीसाठी हे पाऊल महत्वाचे असून, भाजपमध्ये आलेल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. पक्षात एकदिलाने काम करून शतप्रतिशत भाजपचे ध्येय साध्य करायचे आहे,” असे मंत्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!