डोंबिवलीकरांना त्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
डोंबिवली, ता. 01 (प्रतिनिधी) –
आपल्या शहराचे नाव जगभर पसरवून देशाच्या जडणघडणीत प्रत्येक डोंबिवलीकरांचे योगदान आहे. डोंबिवलीकर युवांमध्ये प्रचंड चैतन्य, उत्साह आणि निखळ प्रेम, आपुलकी मला भावते. दरवर्षी इथे दिवाळी पहाटनिमित्त येताना नवनवीन कलासंगती बघायला मिळतात, युवा वर्ग स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड झटत असतो. वेगळेपण निर्माण करणं आणि ते जगासमोर आत्मविश्वासाने मांडून सिद्ध करून दाखवणं ही या शहराची ओळख आहे. असेच अनोख काहीतरी करण्यासाठी माझ्या डोंबिवलीकर तरुणाईला आणि तमाम नागरिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
फडके पथ वर येऊन चव्हाण यांनी तरुणांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद करून भरभरून प्रेम केले.युवकांनी ते व्यासपीठावर येताच रवी दादा आगे बढो…. म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. जय श्रीराम, भारत माता की जय च्या घोषणा दिल्या.एकच जल्लोष आणि प्रचंड स्फूर्ती अस वातावरण तेथे बघायला मिळाल्याचे येणारा प्रत्येक नागरिक मनोमन सांगत होता, आकर्षक कपडे, रंगसंगती असलेल्या वेशभूषा बघून नागरीक एकत्र येतात, गुण्यागोविंदाने नांदतात हे पाहून मजा आल्याचे ते म्हणाले.अशीच दिवाळी पुन्हा २३ नोव्हेंबरला करण्यासाठी हा जोश टिकवून ठेवावा असे आवाहन करत त्यांनी शुभेच्छा देऊन सगळ्यांचे अभिनंदन केले.