दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम महागाई वाढीवर होत असल्याने सर्वसामान्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती तसेच विरोधकांकडून टीकेची झोड उठवून आंदोलन केली जात होती. मात्र पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 5 रुपयांची तर डिझेलच्या उत्पाद शुल्कात 10 रुपयांची कपात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने उद्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार आहेत, त्यामुळे पेट्रेाल डिझेलच्या दरात कपात होणार असल्याने ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
देशात सर्वत्र पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली होती. महाराष्ट्रात सध्या काही ठिकाणी इंधनाचा दर प्रतिलीटर 115 रुपयांपलिकडे गेला आहे. इंधन दरवाढीचा परिणाम खाद्यपदार्थ व अन्न धान्य वाढीवर झाला आहेत त्यामुळे महागाई प्रचंड वाढली आहे इंधनाचा दर कमी होणार असल्याने नागरीकांना दिलासा मिळू शकतो.
इंधनावरील कर हे केंद्र आणि राज्य सरकारांच्या महसूलाचे मोठे मार्ग आहेत. हे कर कमी केले तर महसूल खूप मोठ्या प्रमाणावर बुडतो. म्हणून सहसा सरकार एक्साईज आणि व्हॅट कमी करायला तयार होत नाहीत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन कमी केलंय. आणि त्यामुळे मागणी पेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय. भारतात इंधनांवर विविध कर देखील आहेत. कारण, बरचसं इंधन आपण आयात करत असल्यामुळे त्यावर केंद्र सरकारकडून एक्साईज आणि राज्य सरकारकडूनही व्हॅट सारखे कर लागत असतात.
पेट्रोल पंपचालकांचे मोठे नुकसान …
पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे.पेट्रोल आण डिझेलचे दर अचानक कमी केल्याने पेट्रोल पंप चालक अडचणीत आहे.अचानक झालेल्या कपातीमुळे पेट्रोलपंपचालकांचे मोठे नुकसान होणार आहे. . त्यामुळे पंपचालक बंद पुकारण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे