
डोंबिवली : दि :०९:-
कासा बेला गोल्ड सार्वजनिक नवरात्रोत्सवात ६ व्या दिवशी अंकुर सामाजिक संस्थेतील अनाथ मुलांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. कासा बेला गोल्ड असोसिएशनच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सवात विविध उपक्रम आयोजित केले जातात, यंदा असोसिएशनचे अध्यक्ष योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून अनाथ मुलांना उत्सवाच्या आनंदात सहभागी करण्यात आले. त्यांच्या या विशेष उपक्रमाचा देवी भक्तांनी विशेष कौतुक केले.

योगेश पाटील यांनी सांगितले की, “अनाथाश्रमातील मुलांना इतर मुलांसारखे जीवन जगता यावे आणि त्यांना सण-उत्सवांची माहिती मिळावी यासाठी आम्ही त्यांना नवरात्र उत्सवात बोलवले आहे.” याव्यतिरिक्त, अंकुर सामाजिक संस्थेतील मुलांना देवीच्या आरतीचा मान देण्यात आला आणि त्यांच्यासोबत गरबा देखील खेळण्यात आला.
कासा बेला गोल्ड असोसिएशनने आणि ज्येष्ठ नागरिकांनी अंकुर सामाजिक संस्थेला मदत करून या उपक्रमाला आणखी अर्थपूर्ण बनवले आहे. या उत्सवामुळे अनाथ मुलांचे चेहरे आनंदाने उजळले आणि त्यांना समाजात एक स्थान मिळवण्यास मदत झाली.
——