डोंबिवली, ता. २२ (प्रतिनिधी):-

कल्याण-डोंबिवलीतील १३८ कल्याण पश्चिम, १४२ कल्याण पूर्व, १४३ डोंबिवली, आणि १४४ कल्याण ग्रामीण या चारही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शुक्रवारी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी संबंधित ठिकाणी निवडणूक आयोगाने व्यापक बंदोबस्त ठेवला आहे. मतमोजणीची तयारी, पोलीस बंदोबस्त, आणि मतमोजणी फेऱ्यांची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे आहे.

१३८-कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ

मतमोजणी मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, तळमजला, वसंत व्हॅली रोड, वृंदावन पॅराडाईज, गधार नगर, खडकपाडा, कल्याण पश्चिम येथे होणार आहे.

एकूण टेबल्स: १४ ईव्हीएमसाठी व २ टपाली मतदानासाठी.

फेऱ्यांची संख्या: २१

बंदोबस्त: ३०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात.

मतमोजणी अधिकारी: १६०

१४२-कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ

महिला उद्योग केंद्र, विठ्ठलवाडी स्टेशनच्या समोर, रॉयल रेसिडेन्सीच्या पाठीमागे, राजाराम जाधव मार्ग, साईनाथ येथे मतमोजणी होणार आहे.

एकूण टेबल्स: १४ ईव्हीएमसाठी व २ टपाली मतदानासाठी.

फेऱ्यांची संख्या: २४

बंदोबस्त: पोलीस बंदोबस्तासह पुरेशी सुरक्षा ठेवली आहे.

मतमोजणी अधिकारी व कर्मचारी: १५०

१४३-डोंबिवली विधानसभा मतदारसंघ

मतमोजणी ह भ प सावळराम महाराज क्रीडा संकुल , सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त सभागृह, डोंबिवली पूर्व येथे होणार आहे.

एकूण टेबल्स: १४ ईव्हीएमसाठी व २ टपाली मतदानासाठी.

फेऱ्यांची संख्या: २१

बंदोबस्त: ३०० पोलीस तैनात.

मतमोजणी अधिकारी व कर्मचारी: २५८

१४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

मतमोजणी सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली पूर्व येथे होणार आहे.

एकूण टेबल्स: १९

फेऱ्यांची संख्या: ३२

बंदोबस्त: १५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात.

मतमोजणी अधिकारी व कर्मचारी: १५०

मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाच्या परिणामांकडे मतदार आणि उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असून, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सीसीटीव्हींची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!