डोंबिवली, दि. 26 (प्रतिनिधी)
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचारार्थ भाल गावातील शिवसेना शाखेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन उमेदवार सुभाष भोईर यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीत सुभाष भोईर यांनी भाल गावावरील आपल्या प्रेमाचा उल्लेख करून, येथे महाविकास आघाडीचे जोरदार समर्थन मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. गेल्या पाच वर्षांत रखडलेला भाल गाव आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीला तालुका प्रमुख मुकेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गणेश म्हात्रे, गजानन म्हात्रे,बाळाराम म्हात्रे, मधुकर म्हात्रे, माजी सरपंच विक्रम म्हात्रे, सुखदेव पाटील, रामकृष्ण म्हात्रे, पोलीस पाटील रुपेश म्हात्रे, भगवान म्हात्रे, युवासेना तालुका अधिकारी प्रदीप मढवि, शाखाप्रमुख निशांत म्हात्रे, माजी सरपंच राजेश फुलोरे, शाखा संघटीका छाया म्हात्रे यांच्या सह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!