फुटबॉल स्पर्धेमुळे मिळाली युवा खेळाडूंना चमक दाखवण्याची संधी – आमदार विश्वनाथ भोईर
कल्याण, दि. 10 ऑक्टोबर:
कल्याणातील पहिल्या सुपरलीग आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत रायझिंग स्टार फुटबॉल अकादमीने विजेतेपद मिळवले. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून, तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते ओम प्रभुनाथ भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेत १५ आणि १७ वर्षांखालील अशा दोन गटांत सामने झाले. या स्पर्धेत एकूण २४ संघांनी सहभाग घेतला होता. १५ वर्षांखालील गटात रायझिंग स्टार फुटबॉल अकादमीने यंगस्टार अकादमीला पराभूत करून विजेतेपद पटकावले. तर १७ वर्षांखालील गटात सेंट मेरीविरुद्ध रायझिंग स्टार अकादमीने अंतिम सामना जिंकून दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला १५ हजार रुपये रोख, चषक, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले, तर द्वितीय विजेत्याला १० हजार आणि तृतीय विजेत्याला ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण पार पडले.
आमदार भोईर यांनी या स्पर्धेमुळे कल्याणातील शालेय फुटबॉल खेळाडूंना पहिल्यांदाच आपली कौशल्य दाखवण्याची संधी मिळाल्याचे सांगितले. त्यांनी येत्या काळात अशा स्पर्धा आणखी आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
या बक्षीस वितरण समारंभास शिवसेना विभाग संघटक मा.नगरसेवक प्रभूनाथ भोईर, शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले,गणेश जाधव,अंकुश जोगदंड,नितीन माने, जेष्ठ नगरसेवक जयवंत भोईर, भिवंडी लोकसभा विस्तारक सुचेत डांबरे, सुजित रोकडे, अनंता पगार,भरत भोईर, सतीश भोसले, दिनेश शिंदे, राकेश पाटील, अभय कामल्य, रोशन चौधरी, मेघन सलपी यांच्यासह फुटबॉल खेळाडू फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक लक्ष्मण भांडे सर, सुहास भोपी, आजोयक युवासेना चिटणीस वैभव भोईर, ओम भोईर, तन्मय भोईर, हर्षद भोईर, जित भोईर, तनिष्क भोईर, रोहित कारभारी, संकेत कारभारी, ऋतिक खारूक यांनी परिश्रम घेतले.
—-