उल्हासनगर: ता :28: –
उल्हासनगर 141 विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ओमी कलानी यांनी आज तुतारी चिन्हावर साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केली आहे. नामांकनादरम्यान, त्यांनी शक्तिप्रदर्शन टाळले आणि ते त्यांच्या कुटुंबासह आणि काही समर्थकांसह निवडणूक कार्यालयात दाखल झाले. याच कारण देताना कलानी म्हणाले की, सध्या दिवाळीचा हंगामा सुरू असून, यावेळी शक्तीप्रदर्शन केले असते तर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. व्यापाऱ्यांना दुकाने बंद करून कार्यक्रमाला यावे लागले असते, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असती आणि नागरिकांचीही गैरसोय झाली असती त्यामुळे हा निर्णय घेतला. ओमी कलानी हे उल्हासनगर मतदारसंघात चार वेळाचे आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र आहेत त्यांची लढाई आता विद्यमान आमदार कुमार आयलानी शी होणार आहे. कुमार आयलानी हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत.
राजकीय पंडितही या निवडणुकीच्या समीकरणात ओमी कलानी यांची भूमिका महत्त्वाची मानत आहेत. कलानी यांच्यामुळे निवडणूक लढत अधिकच रोमांचक झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या हालचालीमुळे उल्हासनगरमधील निवडणुकीची रणधुमाळी अधिक तीव्र झाली असून, राजकीय विश्लेषक याला ऐतिहासिक वळण मानत आहेत. तसेच ओमी कलानी यांच्या समर्थनार्थ सर्व स्तरातील लोक रस्त्यावर उतरले आहेत. तरूण असो वा ज्येष्ठ, महिला असो की व्यापारी असो, कलानी यांच्या विजयाबद्दल प्रत्येक वर्गात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
—–