बिल्डर्स, डॉक्टर्स, आर्किटेक, वकील, फार्मासिस्ट, शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींशी चव्हाण यांची सखोल चर्चा
राष्ट्रीयत्वासाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन
डोंबिवली: ता:11:(प्रतिनिधी):-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांसह सर्वच मोठे नेते हे देशाच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. राष्ट्र पुढे नेण्यासाठी} आपल्या सारख्यांचे हजारो हात गरजेचे असून सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे, २० तारखेला मतदान करावे असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. त्यावर कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर चव्हाण अशा शब्दात त्यांचा गौरव करून शहरातील बुद्धिवंतांनी त्यांचे समर्थन प्रकट केले.
जिमखाना येथे झालेल्या एकत्रीकरण उपक्रमात त्यांनी जाहीरपणे भूमिका मांडली, आणि त्यांना बिल्डर्स, डॉक्टर्स, आर्किटेक, सीए पत्रकार, वकील, फार्मासिस्ट, शिक्षक यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली.जिमखान्याचे पर्णाद मोकाशी, सचिन चिटणीस यांनी त्या एकत्रिकरणाचे आयोजन केले होते.त्यावेळी डॉ मिलींद शिरोडकर, आर्किटेक केशव चिकोडी, निवृत्त मेजर विनय देगावकर, बांधकाम व्यावसायिक माधव सिंग, ओंकार दाहोत्रे, राजन मराठे, राहुल दामले, विश्वदीप पवार, मंदार हळबे, नवरे, निलेश वाणी, समीर चिटणीस यांसह विविध क्षेत्रातील बुद्धिवंत उपस्थित होते.
जास्तीतजास्त मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून सगळ्यांनी आवर्जून सहकार्य करावे असेही आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले. अडीच वर्षात अडीच हजारांहून अधिक निर्णय घेण्यात आले त्याबाबत माहिती देण्यात आली. प्रख्यात व्याख्यात्या प्राची गडकरी यांनी सूत्रसंचालन केले.
——