उल्हासनगरमध्ये कुमार आयलानी विरुद्ध ओमी कलानी यांच्या विरोधात होणार निवडणूक

उल्हासनगर : ता :28:-

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार कुमार ऐलानी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी शहरभर शक्तीप्रदर्शन केले. आता उल्हासनगरमध्ये भाजपचे विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्या विरोधात पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी निवडणुकीच्या मैदानात उतरणारला आहे.

कुमार आयलानी यांनी 10 वी पर्यंत शिक्षण घेतले असून ते हॉटेल आणि बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी यांची सत्ता असताना कुमार आयलानी यांनी पप्पू कलानी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचे धाडस दाखवले. कुमार 2004 मध्ये पप्पू कलानी यांच्याकडून पराभूत झाले असले तरी 2009 मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी कलानी यांचा 7 हजार मतांनी पराभव केला. यानंतर, पप्पू कलानी तुरुंगात गेल्यानंतर, 2014 मध्ये आयलानी पप्पूच्या पत्नीकडून निवडणूक हरले, परंतु 2019 मध्ये त्यांनी पुन्हा पप्पू कलानीची पत्नी ज्योती यांचा पराभव केला. आता कुमार आयलानी यांची लढत पप्पू कलानी यांच्या घरातील तिसरे सदस्य आणि पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी यांच्याशी आहे. याशिवाय कुमार आयलानी हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जवळचे मानले जातात.

कुमार आयलानी म्हणाले, भारतीय जनता पक्षाने पाचव्यांदा माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे, मी सर्वांचा आभारी आहे, त्यात मी दोनदा विजयी झालो आणि मला पूर्ण विश्वास आहे की मी मोठ्या आघाडीने जिंकणार आहे, मी पप्पू कलानी, ज्योती कलानी विरुद्ध देखील निवडणूक जिंकली आहे आणि आता ओमी कलानी विरुद्ध निवडणूक जिंकणे खूप सोपे आहे. ओमी कलानी सकाळी किती वाजता उठतात हे संपूर्ण शहराला माहीत आहे, ओमी कलानीच्या वडिलांनी आणि आईने शहरात विकासकामे केली असतील पण ओमी कलानी यांनी आजपर्यंत एकही काम केले नाही. आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न आहे. मी ओमी कलानीला माझा प्रतिस्पर्धी मानत नाही, लोकांना ओमी कलानी सहज सापडत नाहीत. त्याचे रेकॉर्ड खराब आहेत, तो स्वत: म्हणतो की आमच्यावर इतके गुन्हे दाखल आहेत, आमच्या वडिलांवर इतके गुन्हे दाखल आहेत, उल्हासनगरला गुन्हेगारीमुक्त शहर करण्याचे माझे स्वप्न आहे.

——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!