नागरिकांना उन्हात चार तास बसवले, सभेची जय्यत तयारी केली पण योगी आदित्यनाथ आलेच नाही
उल्हासनगर : ता :१४:(प्रतिनिधी )
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार होते, त्यांच्या भाषण ऐकण्यासाठी उल्हासनगर कल्याण मधील मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक उपस्थित होते, पण योगी आदित्यनाथ आलेच नाही आणि नागरिकांनी नाराजी व्यक्त करत सभा स्थळातून निघून गेले. नाराज उत्तर भारतीयांमुळे ऐन निवडणूककीत विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा संपन्न होणार होती. उल्हासनगर आणि कल्याण या परिसरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय नागरिक स्थायिक आहेत योगी आदित्यनाथ येणार होते त्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. दुपारी १ वाजेपासूनच नागरिकांची मोठी गर्दी सभेच्या ठिकाणी जमायला सुरुवात झाली. साडेपाच झाले तरी योगी आदित्यनाथ आले नाही, मात्र त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मूळच्या उत्तर प्रदेशच्या आणि सध्या उल्हासनगर व इतर परिसरात स्थायिक झालेल्या उत्तर भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणावर आले होते. काही तांत्रिक कारणामुळे योगी आदित्यनाथ उल्हासनगर मध्ये आले नाही असं सांगितलं जात असलं तरी याबद्दलही अनेक उलट सुलट चर्चा सुरू झालं आहे. सुमारे तीन ते चार तास योगींचे भाषण ऐकण्यासाठी त्यांचे चहाते बसले होते. मात्र नंतर सर्वांचीच निराशा झाली आणि इतर नेत्यांची भाषण ऐकण्यासाठी पण थांबले नाही. नाराज उत्तर भारतीयांमुळे ऐन निवडणूककीत विद्यमान आमदार कुमार आयलानी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
——-