कोलकाता, 22 एप्रिल: कोलकाता उच्च न्यायालयाने राज्यातील शालेय सेवा आयोगाच्या (एसएससी) माध्यमातून केलेल्या २५ हजारांहून अधिक नियुक्त्या रद्द केल्यानंतर, कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि तामलुक लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अभिजित गांगुली यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, “न्यायालयाने न्याय्य निर्णय दिला आहे पण आजचा दिवस माझ्यासाठी दिलासा देणारा नाही. कारण या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली माझे राज्य चालते. खरे पात्र नोकरी शोधणारे इतके दिवस वंचित आहेत. आशा आहे की त्यांच्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जाईल. ” अभिजीत म्हणाले, “पात्र उमेदवारांना वंचित ठेवण्यात आले आहे. वंचितांमध्ये हिंदू आणि मुस्लिमांचाही समावेश आहे. “राष्ट्रपती राजवटीत निवडणुका व्हाव्यात.”

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना न्यायमूर्ती अभिजीत गांगुली यांनी शिक्षक नियुक्तीतील भ्रष्टाचार प्रकरणांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या अनेक निर्णयांना खंडपीठाने सातत्याने स्थगिती दिली, मात्र सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहून त्यांनी स्थगिती देणाऱ्या खंडपीठातील न्यायमूर्तींवरच प्रश्न उपस्थित केले. अखेरीस, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आणि या प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज हा निर्णय आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!