माजी जिल्हा परिषद सदस्यावर जीवघेणा हल्ला
महाड – तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते व वहूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इब्राहीम झमाने यांच्यावर आज धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. इमाने हे गंभीर जखमी झाले असून. त्यांच्यावर महाड ट्रामा केअर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र हा हल्ला राजकीय पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय इमाने यांनी व्यक्त केलाय.
इमाने हे शुक्रवारी पहाटे नमाज अदा करण्यासाठी मशिदीकडे जात असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला हल्लेखोर हे वाहनातून आले होते. इमाने यांच्या कमरेला आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत. याचवेळी त्यांचे बंधू महमूद झमाने यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. इब्राहीम झमाने यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली असून महाड तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे हे तपास करीत आहेत.