योगदान फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

डोंबिवली : मानवाला आपल्या पुढच्या पिढ्यांना जगवायचे असेल तर शाश्वत विकासाच्या मार्गाशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यासाठी निसर्ग आणि त्यातील प्रत्येक घटकाचे संवर्धन करणे अत्यावश्यक बाब बनली आहे. या संदर्भात जनजागृती व्हावी या हेतूने जागतिक निसर्ग संवर्धन दिनी पक्ष्यांना खाद्य व निवाऱ्यासह वृक्षारोपण आणि कृत्रिम घरट्यांचे योगदान फाऊंडेशनतर्फे नियोजन करण्यात आले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून पक्षी आणि निसर्ग संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या योगदान फाऊंडेशन ट्रस्टच्यावतीने पक्ष्यांना खाद्य व निवारा मिळण्याकरिता टिटवाळ्या नजीकच्या वृक्षरोपण व वसाहतीकरण झालेल्या भागामध्ये पक्षांच्या निवासासाठी कृत्रिम घरट्यांचे वाटप करण्यात आले.   योगदान फाऊंडेशनच्यावतीने पारस बालभवन येथे भेट देऊन लहान मुलांना पक्षी व निसर्ग संवर्धना संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या आयोजित कार्यक्रमात योगदानचे अध्यक्ष मदनमोहन चव्हाण यांच्यासह सुनील शिंदे, शैलेश गिरी, मनोज मोरया, आदी उपस्थित होते.

मानवाने आपल्या सुख-सोयींसाठी निसर्गाच्या केलेल्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा जागतिक निसर्ग संवर्धन दिन मानला जातो. निसर्गाचे आपल्या परिने कसे संवर्धन करता येईल यासाठी एक पाऊल उचलणे, जनजागृती करण्याचे काम या दिवशी केले जाते. निसर्गाचे संवर्धन न केल्याने माणसांना ग्लोबल वॉर्मिंग, विविध आजार, वातावरणीय बदल, प्राकृतिक बदलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला चांगले आयुष्य हवे असल्यास आपल्याजवळ असलेल्या सुंदर निसर्गाचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत योगदान फाऊंडेशनचे अध्यक्ष मदनमोहन चव्हाण यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *