मुंबई : लोकसभा निवडणुकीच्यानंतर आज विधानपरिषदेच्या मुंबई कोकण पदवीधर मतदार संघ आणि मुंबई नाशिक शिक्षक मतदार संघ या चार मतदार संघात आज मतदान होत आहे.  सकाळपासूनच मतदानाला सुरूवात झाली असून, पून्हा एकदा महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणाची सरशी होते याकडे लक्ष वेधलयं. 

 मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब विरूध्द भाजपचे किरण शेलार अशी लढत होत आहे. कोकण पदवीधर मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे विरूध्द काँग्रेसचे रमेश किर यांच्या सामना रंगणार आहे. कोकण पदवीधर मतदार संघात १३ उमेदवार रिंगणात आहेत ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदूर्ग असा हा मतदार संघ पसरला आहे. कोकण विभागात २ लाख २३ हजार २२५ मतदार आहेत यात सर्वाधिक मतदार ठाणे जिल्हयात म्हणजेच ९८ हजार ८६० इतके मतदार आहेत. 

नाशिक शिक्षक मतदार संघात  शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे अपक्ष विवेक कोल्हे यांच्यात लढत होत आहे नाशिकमध्ये महायुतीमध्येच काँटे कि टक्कर पाहावयास मिळत आहे. 

मुंबई शिक्षक मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर विरूध्द  भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे,  शिवसेना शिंदे गट पुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे रिंगणात आहेत मुंबईत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *