पावसामुळे वसई -विरारमधील वीज पुरवठा खंडीत , नागरिकांनी सहकार्य करावे : महावितरणचे आवाहन
वसई : वसई आणि विरार परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणच्या काही सब स्टेशन / डी.टी.सी. मधे पाणी शिरले आहे, तर काही ठिकाणचा संभाव्य धोका लक्षात घेऊन महावितरणने काही परिसरातील वीज पुरवठा बंद केला आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. पावसाचे पाणी ओसरताच सुरक्षेचा आढवा घेऊन वीज पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्चे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी केले आहे.
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून ते फिल्डवर कार्यरत आहेत. ग्राहकांनी परिस्थितीनुसार वा गरजेनुसार आपल्या नजीकच्या कार्यालयाशी / संबंधित अधिकार्यांशी अथवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२००-३४३५ या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
संपर्क
१) डी.टी.सी. बंद –३३ सुमारे ८००० हजार ग्राहक प्रभावित
१) फिडर बंद -२ सुमारे १८००० हजार ग्राहक प्रभावित. अचोळे.
प्रभावित भाग: वसई , विरार , अचोळे , तुळींज , नालासोपारा .