गुजरातचे जनमत चाचण्यांचे अंदाज उध्दव ठाकरेंना पटले नाहीत
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जनमत चाचण्यांमध्ये (एक्झिट पोल) भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मात्र, जनमत चाचण्यांचे अंदाज फारसे पटले नाहीत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी म्हटले आहे. मातोश्री निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मात्र जो निकाल लागायचा तो लागेलच आणि तो सोमवारी कळेलच , तो आपल्याला मान्यही करावा लागेल असेही ते ठाकरे म्हणाले,
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ९ आणि १४ डिसेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले. प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची लढाई असलेल्या भाजप आणि काँग्रेसने गुजरात निवडणुकीत विजय मिळेल, असा दावा केला आहे. मात्र, मतदानोत्तर जनमत चाचण्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं मत प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी विचारल असता त्यांनी यावर भाष्य केलंय. शिवसेनेचा भगवा पुढील काळात महाराष्ट्रात फडकेल. राहुल ने गुजरात मध्ये खूप मेहनत केली,त्यांना शुभेच्छा.ते त्यांच्या पक्षाचा विश्वास सार्थ करतील अशी अपेक्षा भाजप जडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा…मात्र आज ही भारनियमन,कर्जमुक्त,बेरोजगारी हे प्रश्न आहेत. शिवसेनेन सत्तेत गेल्यावर रंग बदललेला नाही.आमची भूमिका ठाम आहे. आम्ही काय करावं हे आम्हाला कुणी सांगू नये उपमुख्यमंत्री पदाची कोणतीही ऑफर नाही असेही ठाकरे म्हणाले.
राहुल गांधींना शुभेच्छा ..
काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचही उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आणि आणि शुभेच्छाही दिल्या. गुजरात निवडणुकीत राहुल गांधी यांनी चांगली मेहनत घेतली. पक्षातील कार्यकर्त्यांच्या राहुल गांधी यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतात का ते आता पाहायचं असेही ठाकरे म्हणाले.