टोकीओ: आज देशात सोनियाचा दिन पहावयास मिळालाय, टोकियो ऑलम्पिक  मध्ये नीरज चोप्राने (neeraj chopra ) सुवर्णपदक {(gold medal )पटकावित इतिहास रचला आहे. भारताला १३ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये हे सुवर्णपदक मिळाले आहे, यापूर्वी नेमबाजपटू अभिनंव बिंद्राने भारताला पहिले सुवर्णपददक जिंकवून दिले होते. नीरज ने  ८७.५८ मीटर लांब भाला फेकत ही कामगिरी केली आहे. त्यामुळे देशाची मान जगभरात उंचावली आहे.

नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. अखेर सुवर्णपदकाला त्याने गवसणी घातली. सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याने तिरंग्यासह मैदानाभोवती फिरून आनंदोत्सव साजरा केला. नीरज वर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोन करून नीरजच अभिनंदन केले. देशाला मैदानी खेळांमधलं पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून  नीरज चोप्रानं आज इतिहास रचला आहे. सुवर्णपदकासोबत देशाचा गौरव वाढवला आहे. कोट्यवधी देशवासियांची मनं त्याने जिंकली आहेत. 

जगभरातील सुमारे 205 देशांतील जवळपास अकरा हजार खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 85 देशांनी किमान एका पदकाची कमाई केली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिका 36 सुवर्ण आणि एकूण 108 पदकांसह अव्वलस्थानी, तर चीन 38 सुवर्ण आणि 87 पदकांसह दुसऱ्या स्थानी राहिला.

बजरंग पुनिया चे ब्रांझ पदक

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताचा पैलवान बजरंग पुनिया याने कुस्ती खेळप्रकारात 65 किलो वजनी गटात ब्रांझ पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!