मुंबई, दि. 24 :- टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी हे पदक मिळवून दिलय. त्यामुळं भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. मीराबाई यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानू यांचं अभिनंदन केलंय.

महिलांच्या ४९ किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक मिळालं आहे .  उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी  वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचंअभिनंदन केलं आहे. मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मिळवलेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूंना उत्तम कामगिरी करुन पदक जिंकण्यासाठी प्रेरणा, विश्वास देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीराबाई चानू यांचं कौतुक केलं.

२०१६ च्या रिओ ऑलिंपिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोमध्ये जिंकलेलं पदक हे अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेनं जीवनात कसं यशस्वी व्हावं, याचं आदर्श उदाहरण असल्यांचही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. भारतीय हॉकी संघानं आपला पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध 3-2 असा जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं असून अन्य खेळाडूंनाही उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

मणिपूरची राजधानी इम्फाल येथे राहणारी मीराबाई चानूचा जन्म ८ऑगस्ट १९९४ रोजी इम्फाळ येथे झाला. 26 वर्षांची मीराबाई चानूने वयाच्या ११ व्या वर्षी स्थानिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले. नंतर, तिने आंतरराष्ट्रीय आणि आशियाई ज्युनिअर स्पर्धेत भाग घेऊन अनेक पदक मिळवली .अनेक संघर्षानंतर मीरा चानूला यश मिळालयं.

( सिटीझन न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला Facebook, Instagram,  Twitter, Likdin आणि  YouTube  वर नक्की फॉलो करा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!