स्वतंत्र विदर्भासाठी 7 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत आत्मबळ यात्रा निघणार
भाजपचे आमदार डाॅ आशिष देशमुख यांचा स्वतंत्र विदर्भाचा एल्गार
मुंबई ( निलेश मोरे ) : विदर्भातील सध्याची परिस्थिती , सिंचनाचा अनुशेष , शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या , बेरोजगारी , उद्योगधंदे , कुपोषण , नक्षलवाद आदी विदर्भातील सर्वांगीण विकासाच्या प्रश्नावर आमदार देशमुख यांनी 7 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत विदर्भ आत्मबळ यात्रेचे आयोजन केले असून आज मुंबई पत्रकार संघात विदर्भ आत्मबळ यात्रेच्या माध्यमातून डॉ आशिष देशमुख यांनी वेगळा स्वतंत्र विदर्भाचा एल्गार केला. तेलंगणा प्रमाणे मराठी भाषेचे दोन राज्ये बनली तर मराठी भाषा आणि मराठी माणसाची अस्मिता वाढेल असही ते म्हणाले.
देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे . त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झाला आहे . विदर्भात कोणत्याच विकासाच्या सुविधा निर्माण होत नसल्याने बेरोजगारी बेसुमार वाढली आहे . राज्याच्या एकूण वीज निर्मितीपैकी 70 टक्के वीज विदर्भात होते . विदर्भातून मुंबई व पुणे शहराला 24 तास वीज उपलब्द आहे मात्र लोडशेडिंगमुळे इथल्या उद्योगावर मोठा परिणाम झालेला आहे . विदर्भात कोणतीच गुंतवणूक होत नसल्याने उद्योग दुसऱ्या जिल्ह्याकडे वळत आहे त्यामुळे इथला युवक बेरोजगार बनत आहे . वेगळा विदर्भ ही भाजपाची जरी कल्पना असली तरी यामध्ये सामाजिक संघटना आणि सर्व पक्षांनी याला पाठिंबा द्यावा अशी मागणी डॉ आशिष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली . डॉ देशमुख यांनी विदर्भातील 62 मतदार संघात विदर्भ आत्मबळ यात्रा सुरू केली असून एकूण 11 जिल्ह्यतील जनतेशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्यासाठी ही विदर्भ आत्मबळ यात्रा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले . फेब्रुवारी 2018 मध्ये कस्तुरचंद पार्क नागपूर येथे युवक व शेतकरी मेळाव्यातून या यात्रेचा पहिला टप्पा संपणार आहे .