मुंबई : शेअर बाजारात आज चढ-उतार होता. शेअर बाजार सुरुवातीला विक्रीचा सपाटा होता. पण दुपारच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी सावरला. सेन्सेक्स आज ७१,०३५ वर खुला झाला होता. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ७०० अंकांनी कोसळून ७०,८५० पर्यंत खाली आला. पण दुपारच्या सत्रात त्याने ७१,८०० वर व्यवहार केला. सेन्सेक्स २६७ अंकांनी वाढून ७१,८२२ वर बंद झाला. सेन्सेक्सने दिवसाच्या निच्चांकावरून सुमारे १ हजार अंकांनी सावरला. निफ्टी १९८ अंकांनी घसरून २१,५५० च्या खाली गेला होता. मात्र दुपारच्या सत्रात निफ्टी ९६ अंकांच्या वाढीसह २१,८४० वर स्थिरावला.
