दिव्यांग श्रीकांत घुगेला ५० हजारांची मदत
कल्याण/प्रतिनिधी : कल्याण मधील विजय तरुण मित्र मंडळाने गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत बारावीच्या परीक्षेत 90 टक्के घेत यश प्राप्त केलेल्या दिव्यांग विद्यार्थी श्रीकांत घुगे याला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली तसेच आय ए एस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीकांतच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील मंडळातर्फे केला जाणार असल्याचे जाहीर केले कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या हस्ते घुगे याला 50 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला .यावेळी घुगे याची दिव्यांग बहीण तसेच त्याच्या आई वडिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
विजय तरुण मित्र मंडळ हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांना मदतीचा हात देतात .विशेष म्हणजे या मंडळाचे अध्यक्ष मुस्लिम असून त्यांचे नदीम आगा आहे .त्यामुळे हे मंडळ जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण आहे .यंदाच्या बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी श्रीकांत घुगे याने 90 टक्के मार्क मिळवले .कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या घुगे ने भविष्यात आय ए ए एस अधिकारी व्हायचे आहे असे सांगितले .मंडळाने त्याला यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करत 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे तसेच घुगे याला पुढील शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे .मंडळाचे प्रमुख विजय साळवी हे गणेशोत्सव काळात कोरोना ग्रस्त झाल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत .त्यांची प्रकृती आता स्थिरावली असली तरी त्यानी मंडळाच्या सामाजिक कार्यात खंड पडू दिला नाही यामुळे या मंडळाचे कार्य उल्लेखनिय ठरले आहे.
———