डोंबिवलीतील दानशूर प्रल्हाद म्हात्रेंचा  “किक बॉक्सिंग” खेळाडूला आर्थिक मदतीचा हात !

डोंबिवली :- लग्नासाठी पैशाची अडचण असो वा शिक्षणासाठी गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमीच मदतीचा हात पुढं असणारे डोंबिवलीतील एक नाव म्हणजे प्रल्हाद म्हात्रे ! त्यांच्या दानशूरपणाचा अनुभव डोंबिवलीकरांनी अनेकवेळा अनुभवलंय. किक बॉक्सिंग खेळाडूच्या मदतीसाठी प्रल्हाद म्हात्रे यांनी पुन्हा मदतीचा हात दिलाय.  आंतरराष्ट्रीय स्तरावर डोंबिवलीचे नाव मोठे करण्याचे निश्चय करणाऱ्या अक्षय गायकवाड या खेळाडु डोंबिवलीतील समाजसेवक प्रल्हाद म्हात्रेंनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी त्याचे एक वर्षाचे आर्थिक पालकत्व स्वीकारले आहे.

अक्षय बाळाराम गायकवाड पश्चिमेतील गायकवाडवाडी परिसरात राहतो. अतिशय मेहनत करून किक बॉक्सिंग मध्ये चमकदार कामगिरी केलीय. अहमदनगर राज्यस्तरीय स्पर्धेत २०१६ रोजी कास्यपदक, दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक,आंतरराष्ट्रीय कीक बॉक्सिंग सेमिनार व राष्ट्रीय संघ निवडीमध्ये २०१७ रोजी सुवर्णपदक पटकाविले आहे. तसेच तुर्कमोनिस्तान येथे एशियन कीक बॉक्सिंग स्पर्धेत २०१६-१७ मध्ये कास्यपदक मिळविले आहे. कल्याण खडकपाडा येथील मोहनप्लनेट मधील मोहनसिंग सर, बोमार्शल आर्ट क्लास मधील संजय कतोड यांच्याकडे कीक बॉक्सिंगचे प्रशिक्षण सुरु आहे.  आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी  सुवर्णपदक मिळवून  देण्यासाठी अक्षयची धडपड आहे .परंतु अक्षयची घरची परिस्थिती बेताचीच आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आणि आर्थिक मदतीसाठी गेल्या वर्षी समाजसेवक प्रल्हाद म्हात्रे यांची भेट घेवून त्यांच्याकडे आपली समस्या मांडली. परंतु काही कारणास्तव म्हात्रे यांना काही मदत करणे  शक्य झाले नाही. दरम्यान यावर्षी एका कार्यक्रमात अक्षयच्या सत्कार सोहळ्याचे साक्षीदार स्वतः प्रल्हाद म्हात्रे असल्याने त्यांनी निर्णय घेतला कि, “कीक बॉक्सिंग” मध्ये करियर करू पाहणाऱ्या डोंबिवलीच्या अक्षयचे वर्षभराचे पालकत्व घ्यायचे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्याला पहिला धनादेश देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!