डोंबिवली : डोंबिवलीत स्केटींग स्पर्धा पार पडली असं कोणी म्हटलं तर नक्कीच विश्वास बसणार नाही. कारण डोंबिवलीतील खड्डेमय रस्त्याची गाथा सर्वदूर पसरली आहे. पण खरोखरच डोंबिवलीत स्केटींग स्पर्धा पार पडलीय,,, कल्याण शीळ रस्त्यावरील अनंतम रेसिडेन्सीमध्ये ही स्पर्धा पार पडली असून, या स्पर्धेला तब्बल १८२ खेळाडूंनी सहभाग घेतला हेाता.


स्केटिंग असोसिएशन (कल्याण तालुका) आणि रिजेन्सी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली रिजेन्सी ट्रॉफी स्पर्धा अनंतम रेसिडेन्सी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत ठाणे, मुंबई पालघर रायगड येथील 182 खेळाडू सहभागी होऊन स्पर्धाला चांगला प्रतिसाद दिला. ही स्पर्धा स्केटिंगच्या पाच विविध प्रकारांमध्ये खेळवण्यात आली. या स्पर्धेत मुंबईच्या टीम एक्स्ट्रीम या क्लबने विजेतेपद, तर मीरा-भाईंदरचा स्केट लाईफ क्लबने उपविजेतेपद पटकावले. तर एम. के. क्लबला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील विजेत्या संघाला रीजन्सी ट्रॉफी आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेच्या अतिम पारितोषिक वितरण समारंभासाठी रिजेन्सी ग्रुपचे डायरेक्टर राहुल भाटिचा यांच्या हस्ते करण्यात आले. तर या स्पर्धेसाठी रीजन्सी ग्रुपचे डायरेक्ट विकी रूपचंदानी यांचे सहकार्य लाभले. यावेळी कियांश अग्रवाल, तक्षी परदेशी, सात्विक मोरया, काशवी जोशी, रिनेश गुप्ता, केरा जगदाळे, निव्ह कृष्णन, अनिरुद्ध बागरी, मिहिका दास, दिवा मल्होत्रा, रुद्र पवार आणि संस्कृत यमगर या विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *