डोंबिवली: शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून, 11 ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील होरायझन सभागृहात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचे आयोजन शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या मेळाव्यात सुमारे 5,000 तरुणांनी सहभाग घेतला.

रोजगार मेळाव्यात 130 हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतल्याने हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार मिळविण्याची संधी मिळाली, ज्यामुळे डोंबिवलीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कार्यक्रमाला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, उपशहर प्रमुख संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, माजी नगरसेवक संजय पावशे आदी मान्यवर उपस्थित होते.

रोजगार मेळाव्याबाबत बोलताना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले, “खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र व डोंबिवली विधानसभा क्षेत्रासाठी महाराष्ट्र शासन व शिवसेना शाखेच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. नुकत्याच परीक्षा झालेल्या असल्याने अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. या मेळाव्यात अशा तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. हजारो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या असून, मेळाव्यात योग्य पात्रतेच्या उमेदवारांना ऑन-दि-स्पॉट नियुक्तीपत्र देण्यात आले. हा रोजगार मेळावा युवक-युवतींना त्यांच्या करिअरसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध करून देणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!