सेालापूर , 14 मे : कर्नाटकचा मुख्यमंत्री ठरविण्यासाठी काँग्रेसने ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तीन जणांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

शिंदे दुपारी सोलापूर विमानतळावरून खास विमानाने बंगळुरूकडे रवाना झाले. कर्नाटकमध्येकाँग्रेसला स्पष्ट बहुमत आल्यानंतर आता तिथे मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा देशभर रंगली आहे. त्यातच, प्रदेशाध्यक्ष डीके. शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांची नावे प्राधान्याने पुढे आहेत. मात्र, या दोनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आता सुशीलकुमार शिंदे यांचं मत महत्त्वाचं ठरणार आहे.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डि.के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची नावे चर्चेत आहे. पक्षाचा नवा विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी जितेंद्र सिंग, दीपक बाबारिया यांची समिती नेमली आहे. सुशीलकुमार शिंदे एका लग्न समारंभासाठी रविवारी सोलापुरात आले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के.सी. वेणुगोपाल यांचा त्यांना फोन आला. आपल्यासाठी पक्ष खास विमान पाठवेल. आपण सायंकाळपर्यंत बंगळूरमध्ये यावे, असा निरोप दिला. सुशीलकुमार शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे सोलापूर विमानतळावरून बंगळूरकडे रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *