36 व्या नॅशनल गेम्स व 75 व्या सिनियर नॅशनल स्पर्धेची निवड चाचणी स्पर्धेत

ठाणे : 36 व्या नॅशनल गेम्स व 75 व्या सिनियर नॅशनल स्पर्धेची निवड चाचणी नुकतीच (6 ते 8 ऑगस्ट) ठाण्यातील ठाणे क्लब येथे पार पडली . या स्पर्धेत मुंबई, पुणे व ठाण्याच्या जलतरणपटूंचा वरचष्मा राहिला.

सदर ट्रायल ही स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तसेच महाराष्ट्र स्विमींगच्यावतीने आयोजित करण्यात आली. स्व‍िमींग ट्रायल्स यशस्वी होण्यासाठी आमदार रविंद्र फाटक, ॲङ निरंजन डावखरे, युवा सेनेचे नितीन लांडगे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेचे अतुल पुरंदरे, स्टारफिश स्पोर्टस फाऊंडेशनचे राजेश मोरे, वैशाली नेरपगारे,दि ठाणे क्लबच्या निकीता शर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले.ह्या पुर्ण स्पर्धेवर स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे कन्वेनर राजेंद्र पालकर ह्यांच्या देखरेखखाली पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *