रत्ननिधी ट्रस्टचा सामाजिक आदर्श : नववर्षाच्या पूर्वसंध्येला रोडपाली शाळेला टॉयलायब्ररीसाठी खेळणी भेट
पनवेल : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत आपल्याकडे जल्लोषात आणि वेगवेगळया पध्दतीने साजरे केले जाते. मात्र मुंबईतील रत्ननिधी चॅरीटेबल ट्रस्ट याला अपवाद ठरलीय. रत्ननिधी चॅरीटेबल ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत वेगळया पध्दतीनेच नववर्षाचे स्वागत केलय. सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असणा-या रत्ननिधी ट्रस्टच्यावतीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला रविवारी पनवेल येथील रोडपाली (बौद्धवाडी) गावातील शाळेला टॉयलायब्ररीसाठी खेळणी भेट देत समाजापुढं एक आदर्श उभा केलाय. ट्रस्टचे अध्यक्ष राजीव मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पत्रकार श्रीरंग सुर्वे, सुमती सुर्वे आणि सुबोध मुझूमदार यांनी ही खेळणी शाळेला भेट दिली. यावेळी शाळेच्या शिक्षिका ज्ञानदा भोईर, रोडपाली गावातील सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड, सुभाष गायकवाड, मारूती गायकवाड, पांडूरंग गायकवाड, नशीब गायकवाड, जीवन गायकवाड, संजय गायकवाड यांच्यासह आदी उपस्थित होते. खेळणी मिळाल्याने विद्याथ्यांच्या चेह-यावर आनंद पसरला होता. ट्रस्टच्यावतीने गोरगरीबांना अन्न वाटप, कपडे वाटप विद्याथ्याँना शालेय साहित्य वाटप अपंगांना जयपूर फुट आदी साहित्य वाटप केले जाते. जाते. ट्रस्टच्यावतीने मुंबईत दररोज ३०० मुलांना अन्न वाटप केले जाते.
असा रंगला कार्यक्रम