रंगभूमी दिनानिमित्त पत्रकार शंकर जाधव यांचा सत्कार
डोंबिवली : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रविवार ५ नोव्हेंबर रोजी आनंद बालभवन येथे सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात डोंबिवलीतील सु. श्री. इनामदार, भालचंद्र कोल्हटकर , सुरेश सरदेसाई , रमेश भिडे , विवेक जोशी आणि डॉ. संजय रणदिवे या सहा ज्येष्ठ रंगकर्मीचा तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्तम काम करणारे डोंबिवलीतील पत्रकार शंकर जाधव यांचा विशेष सत्कार होणार आहे. यावेळीप्रमुख पाहुणे म्हणून कॉमेडी एसक्प्रेस फेम प्रभाकर मोरे , अभिनेता नंदू गाडगीळ , नाटककार प्रवीण शांताराम आणि आनंद म्हसवेकर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विविध रंगी , विवीध ढंगी भरतनाट्य , लोकनाट्य सादर होणार असून स्वप्ना कुंभार देशपांडे आणि ३० नृत्य कलाकार यात असणार आहेत. विनोदी विडंनात्मक संस्कृत नाट्य की दौ घ ( संदर्भ कट्यार काळजात घुसली ) सादरकर्ते युवराज ताम्हणकर आणि सहकारी तसेच ज्येष्ठ अभिनेते रमेश भिडे हे वि. भा. शिरवाडकर – कवी मनाचा नाटककार यांचा जीवनपट सादर करणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *