राज ठाकरे आले अन् रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस कल्याण डेांबिवलीत असल्याने केडीएमसीचे अतिक्रमण विरोधी पथक चांगलेच कामाला लागले होते. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी डोंबिवली स्टेशन परिसरातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला हेाता.
अनधिकृत फेरिवाल्यांविरोधात मनसेचे जोरदार आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनात ११ मनसैनिकांना अटक होऊन एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती. राज ठाकरे हे शुक्रवारी व शनिवारी डोंबिवली व कल्याण दौ-यावर असल्याने पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक डोळयात तेल घालून कामाला लागले हेाते. शनिवारी राज ठाकरे हे मुंबईकडे रवाना झाल्यानंतरही डोंबिवलीतील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला हेाता. फेरीवाल्यांनी व्यापलेला आणि रस्त्याने चालणेही मुश्किल असणारा डोंबिवली स्टेशन परिसरातील रस्ता मोकळा झाला होता. त्यामुळे डोंबिवलीकरांनाही मनमोकळेपणाने रस्त्याने चालता आले. मात्र पालिकेची ही कारवाई किती दिवस टिकते याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
डोंबिवली स्टेशन परिसरातील शनिवारी रात्रीचे दृश्य