मुंबई : भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. काँग्रेससाठी ही दुर्दैव गोष्ट आहे. भाजपचे तंत्रच आहे, प्रेशर आणि ब्लॅकमेल करुन लोक पक्षात आणायचे असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर आज काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना केला.
अशोक चव्हाण यांनी सध्या काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. ते पुढे काय करणार हे आता त्यांनी सांगितलेलं नाही. अशोक चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री होते. त्यांच्या पत्नी आमदार होत्या. त्यांच्याशी देखील माझं बोलणं झालं असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले.
ज्या पद्धतीने भाजपकडून माइंड गेम खेळलं गेलं ते मी रेकॉर्डवर आणू शकतं नाही, पण अतिशय हताश होऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अजून ही काँग्रेसमधील अनेक नेत्यांना त्रास देणे सुरूच आहे, हे असलं राजकारण देशात पहिल्यांदाच होत आहे अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केली.
प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या आमच्या राजीनामा बाबतीत बोलल्या जाणाऱ्या गोष्टी या सगळ्या अफवा आहेत. मी आणि साहेबांनी (सुशीलकुमार शिंदे) याबाबतीत स्पष्टीकरण दिलेला आहे.