१० व्या एशियन सिनियर कुराश चॅंपियनशीप  स्पर्धेत, पूर्वा मॅथ्यू ने पटकावले कांस्य पदक !
डोंबिवली :  ज्यूदो खेळामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे, महाराष्ट्राचे आणि डोंबिवलीचे नाव उंचावणारी व्हिक्टरी ज्युदो क्लब चर्या पूर्वा मॅथ्यू ने एशियन स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. १० व्या एशियन सिनियर कुराश चॅंपियनशीप स्पर्धा नुकतीच पुणे येथे पार पडली. या स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झालेली.  महाराष्ट्राची ती एकमेव खेळाडू होती. कुराश कॉनफेडरेशन  ऑफ एशियाचे  अध्यक्ष कॉमिल रूझिएव्ह  आणि भारतीय कुराश महासंघाचे अध्यक्ष जगदीश टायटलर, टिळक महाराष्ट्र् विद्यापीठाचे कुलगुरु दिपक टिळक आदि मान्यवरांच्या हस्ते सर्व पदक विजेत्यांना  सन्मानित करण्यात आले.  दि. २४ व २५ मार्च २०१८ रोजी भारतात १० व्या एशियन सिनियर कुराश चॅंपियनशीप  पुणे येथे पार पडल्या. भारतासह नेपाळ, श्रीलंका,  चायनिज तायपे, कोरिया, व्हिएटनाम, इराण, कझाकिस्तान,  तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान इत्यादी १४ देशातील सुमारे २५० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते.  या स्पर्धेत भारतातर्फे ४८ किलो खालील वजनी गटात  खेळताना  पूर्वा मॅथ्यू  हीने कांस्यपदक पटकावले. पूर्वा मॅथ्यू ही ज्युदोची एशियन कॅडेट गटाची सुवर्णपदक विजेती खेळाडू आहे.व (Best Player of Asia)  या पुरस्काराने सन्मानित आहे. कुराश (Wrestling form of Uzekistan) च्या  ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग व ३ एशियन स्पर्धांमधे ३ कांस्यपदकांची कमाई तिने केली आहे.   ज्युदोच्या २७ राष्ट्रीय स्पर्धांमधे पूर्वाने ६ सुवर्ण, ६ रौप्य व ९ कांस्य पदके पटकावली आहेत.  या स्पर्धैत भारतीय संघाचा कोच म्हणून आमच्या व्हिक्टरी ज्युदो क्लबचा ज्युदो कोच , राष्ट्रीय ज्युदो खेळाडू आणि कुराशचा आंतरराष्ट्रीय कांस्यपदक विजेता तसेच इनडोअर एशियन गेम्स, उझबेकिस्तान येथे सहभागी  खेळाडू आशुतोष लोकरे याची नियुक्ती करण्यात आली होती व ती जबाबदारी  त्याने यशस्वीरित्या पार पाडली.  पूर्वा  आणि आशुतोष या  दोन्ही विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशस्वी कामगिरी बद्दल कोच के.ए.मॅथ्यू यांनी अभिनंदन केले आहे. तसेच डोंबिवलीकरांकडूनही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
One thought on “१० व्या एशियन सिनियर कुराश चॅंपियनशीप  स्पर्धेत, पूर्वा मॅथ्यू ने पटकावले कांस्य पदक !”
  1. श्री:

    पूर्वा

    अभिनंदन!

    असंच अपूर्व यश मिळवत रहा.

    इतिहास घडवत रहा.

    चंद्रकांत जोशी, इतिहास संकलन समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *