मुंबई दि.27: निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असते. निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये तसचं पराभावाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपलं गेले पाहिजे असं म्हणत अजितदादांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवले. तसेच आता विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत. त्यावर लक्ष्य केंद्रीत करून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारिणीची बैठक आज मुंबईतील गरवारे हॉल येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मरावबाबा आत्राम,
यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे प्रमुख, आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार यांनी बैठकीस संबोधित केले.

येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २५ वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवविले जातील, असे अजितदादांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय हे महायुतीच्या सरकारच्या काळात घेतले आहेत. शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा ही आपल्या पक्षाचा मूळ गाभा असून कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही ही विचारधारा सोडणार नाही, असे अजितदादांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. प्रफुल पटेल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. येणारी विधानसभा निवडणूक आपणा सर्वांसाठी महत्त्वाची असून त्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे प्रफुल पटेल म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पक्षाचा राष्ट्रीय दर्जा आपल्याला परत मिळवायचा आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा विस्तार देशभरात करायचा असल्याचा निर्धार प्रफुल पटेलांनी केला. त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचं आवाहन त्यांनी केलं.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांनी संबोधित केले. येत्या ४ जूनला एनडीएचं सरकार येईल. मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही सर्वांनी अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यावर महाराष्ट्राची जनता १०० टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात वैचारिक पातळी खालावलेली दिसली. मात्र, प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी कोणाविषयी टीका टिपण्णी करताना मर्यादा ओलांडली नाही, याचा सुनिल तटकरे यांनी आवर्जून उल्लेख केला. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार आहोत याचा अभिमान असल्याचं ते म्हणाले.

पुढे आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे त्या दृष्टीने आपल्याला आता संघटनात्मक बांधणी करायची आहे. एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र ही भूमिका घेऊन आजपासून सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन करत आपल्याला अपेक्षित असलेले यश निश्चितपणे मिळेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनापूर्वी जिल्हास्तरावर विभागीय मेळावे घेणार असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच १० जूनला पक्षाचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित केले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागून त्यादृष्टीने पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर द्यावा आणि सर्वांनी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, प्रदेश सरचिटणीस तथा कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, धाराशिव लोकसभेच्या उमेदवार सौ. अर्चनाताई पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, आ. प्रकाश सोळंके, आ. दिलीप मोहिते, बाबाजानी दुर्राणी, आ. बबनराव शिंदे, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. शेखर निकम, आ. बाबासाहेब पाटील, आ. बाळासाहेब आजबे, आ. इंद्रनील नाईक, आ. विक्रम काळे, आ. सुनिल शेळके, आ. मकरंद आबा पाटील, आ. दिपक चव्हाण, आ. देवेंद्र भुयार, आ. चेतन तुपे, आ. यशवंत माने, आ. नितिन पवार, आ. अण्णा बनसोडे, आ. राजेश पाटील, आ. किरण लहामटे, आ. राजू कारेमोरे, आ. दौलत दरोडा, आ. राजू नवघरे, आ. सरोज अहिरे, माजी आमदार रमेश थोरात, मुश्ताक अंतुले, विलास लांडे, आ. अनिकेत तटकरे, आनंद ठाकूर, दिपक आबा साळुंखे, कैलास पाटील, पंकज भुजबळ, अरविंद चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, राजलक्ष्मी भोसले, ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रवक्ते आनंद परांजपे, अल्पसंख्याक सेलचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी, सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख सुनील मगरे आणि सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!