नवी दिल्ली : केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी हिमानी उत्तम परब यांना आणि अंकिता रैना यांना टेनिसमधील चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार तर बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 13 नोव्हेंबर 2021 रोजी एका विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी 12 खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यासह ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’ आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ असे एकूण 10 खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना जाहीर झालेले आहेत. याशिवाय ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील 5 खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. 2 संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ आणि पंजाब विद्यापीठ, चंदीगडला ‘मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी’ ची घोषणा करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी हिमानी उत्तम परब यांना आणि अंकिता रैना यांना टेनिसमधील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. अंकिता रैना यांचा जन्म गुजरातचा असून वर्ष 2007 पासून त्या पुणे येथे टेनिसचे प्रशिक्षण घेत आहेत. बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्या खेळाडूंची कामगिरी सलग चारवर्ष कौतुकास्पद अशा खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते.

खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कॉरपोरेट संस्था ज्या खेळाडू आणि खेळांना प्रोत्साहन देतात अशा संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन’ पुरस्काराने गौरिवण्यात येते. आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!