आधी आदर्श पुनवर्सन, नंतरच धरण !
नरडवे धरणग्रस्तांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट
मुंबई : आधी पुनवर्सन नंतरच धरण असे शासनाचे धोरण असतानाही गेली 18 वर्षें होऊनही धरणग्रस्तांच्या योग्य पुनर्वसनाबाबत शासनाकडून अजूनही दखल घेण्यात आलेली नसल्याने आधी आदर्श पुनवर्सन नंतरच धरण असा ठाम निर्धार नरडवे धरणग्रस्तांनी घेतलाय. त्यामुळे नरडवे धरणग्रस्त संघर्ष कृती समिती मुंबई येथील पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. धरणग्रस्ताच्या समस्या जाणून घेण्यासाठी येत्या 17 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार असून या बैठकीला जलसंपदा मंत्री स्वतः हजार राहणार आहेत.
गेले 18 वर्षांपासून धरणाचे काम रखडल्याने 28 जानेवरील नरडवे येथे प्रकल्प ग्रस्तांची मीटिंग घेण्यात आली होती. त्यावेळी मागण्या पूर्ण होई पर्यंत धरणाचे काम बंद राहील असा ठराव एकमतानाने मांडण्यात आला. त्याची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सोमवार दि. 5 फेब्रुवारीला ओरस येथे धरणग्रस्तांची सभा घेऊन धरणग्रस्तानची मते जाणून घेतली. त्यानंतरही धरणग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय धरणाला विरोध राहील, असे धरणग्रस्तांमध्ये एकमताने निश्चित झाले, त्यानंतर मुंबई कमिटीचे पदाधिकारी सुरेश सहदेव ढवळ, कवी संतोष सावंत,दिवाकर राणे, जगदीश पवार, गणपत चव्हाण, शंकर वा सावंत, रामचंद्र गावठे, वासुदेव सावंत, मधुकर पालव, सुरेश पालव, लुईस डोसोझा, डिंगबर मेस्त्री, प्रकाश तेजम, आणि इतर अनेक धरण ग्रस्तांनी मिळून सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार राजन तेली यांचीही भेट घेतली. त्याना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यांनीही या प्रकरणी शासकीय बातचीत केली. त्यानंतर आज धरणग्रस्तांनी मंत्री महोदयांची भेट घेतली.