नारायण राणेंच्या नव्या राजकीय दिशेला घटस्थापनेचा मुहूर्त
कुडाळ : पितृपक्षात कोणताही निर्णय घोषित करणार नाही. येत्या २१ तारखेला घटस्थापनेच्या दिवशी पुढची दिशा स्पष्ट करणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी सोमवारी कुडाळमध्ये केली. यावेळी राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.
सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. कॉग्रेसच्या एकाही नेत्याने मला विचारलं नाही. तसेच कोणालाही कोणतीही नोटीस न देता कार्यकारणी बरखास्त केली गेली.”, अशी खंत राणेंनी व्यक्त केली. “नारायण राणे त्यांना कळला नाही. म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला.राणेंना डिवचलं की त्यांना दुप्पट ताकद येते. हे त्यांना माहित नाही. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. मात्र मी तिथेच आहे. डिवचणारे मात्र दिसत नाहीत.” असेही राणे म्हणाले. अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्ष संपवायची सुपारी घेतल्याची टीका त्यांनी केली. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समर्थ विकास पॅनल निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आमदार नितेश राणे यांनी हुसेन दलवाई की हलवाई आहे हे माहित नाही असे चिमटा काँग्रेसवर चौफेर टीका केली. महाराष्ट्रात नारायण राणेंना ओळखले जाते. अशा नेत्याच्या मागे उभे राहावे असे आवाहन निलेश राणे यांनी केले. विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी करणार नाही असे निलेश राणे म्हणाले.