मोदी ‘व्हीलन’ तर मग त्यांच्या ‘डर्टी पिक्चर’मध्ये शिवसेना कोण ? ‘साइड व्हीलन’ ! विखे पाटील यांची टीका
नाणार प्रकल्पावरून काँग्रेसचा शिवसेनेवर प्रहार 
मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची नाणार येथे जाहीर सभा झाली. नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यावेळी ठाकरे यांनी मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर वर टीका केली होती. मात्र नाणार प्रकल्पावरून काँग्रेसने शिवसेनवर प्रहार केलाय.  उद्धव ठाकरे मोदींना व्हीलन म्हणतात. मग मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो डर्टी पिक्चर सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे? मोदी व्हीलन असतील तर उद्धव ठाकरेंना साइड व्हीलनच म्हणावे लागेल, असा घणाघाती हल्लाबोल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.
नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या विरोधाचा पंचनामा करताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे त्यांच्यात आणि भाजपात झालेल्या एका डीलचा भाग आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, “नाणार नाही देणार! ”. मग नाणारच्या तहात काय घेणार? ते उद्धव ठाकरेंनी सांगून टाकावे. शिवसेना पक्षप्रमुख असेही म्हणतात की, मावळे विकले जात नाहीत. मावळे विकले जात नाहीत, हे खरे आहे. म्हणूनच तर शिवसेना आजवर टिकून आहे. पण आजचे स्वयंघोषित सेनापती मात्र विकले जातात, ही दुर्दैवाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याचा आरोप उद्ध्व ठाकरे करतात. असे असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम तरी कशाला राहतात?सरकारमधून बाहेर पडण्याच्या शिवसेनेच्या इशाऱ्यांची आता डबल सेन्चुरी होत आली आहे, अशी बोचरी टीका करून आता तरी शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!